सुरेख आणि सरल  भाग २


आता पुढे एकच विनंती ती सुद्धा याच अलिखित न्यायाने आणि अधिकाराने. विनंती फार दुरास्त किंवा अवजड नाही. अगदी साऱ्या मर्यादा तोडत राम देखील वनवास टाळू शकला असता. स्वत: श्रीकृष्ण एक हातात चक्र घेत त्या कौरवांचा नायनाट एका क्षणात करू शकला असता पण त्यांनी देखील नियतीला महत्त्व दिले. नियतीला सन्मान दिला, स्वत: त्रास अन विरह सहन केले. अगदी रामायण काळात न्यावे लागते कारण कर्तव्य कसे पार पाडावे याचे उदाहरण म्हणजे ती मंडळी. असो.
विनंतीविशेष अगदी किरकोळ. काय आहे ना आपल्याकडे असं बोलतात की दृष्टीआड झाला की सृष्टीआड झाला अस समजावं. याचं स्पष्ट रूप म्हणजे आपली मित्रमंडळी, वेळोवेळी भेटलेली माणसे. तो धागा, ती दीर्घ बात आणि तो झरा परत कधीच वाहत नाही. एकदा पुलाखालून पाणी वाहून गेलं की सगळ काही धुरकट होऊन जाते. व्यक्ती म्हणतो की आजकाल इतकी साधने आहेत, इलेक्ट्रोनिक मिडिया आहे वगैरे वगैरे..पण बित गई सो बात गई म्हणतात ते पूर्णसत्यच आहे. म्हणून लक्षात ठेवा या लहान मूर्तीला. कधी भविष्यात वाटले तर भेटा अन हव्या तेवढ्या गप्पा मारा. दोष द्या, शिव्या घाला, रागे भरा. पण मनात ठेवा. एक आनंदाचा अश्रू ढळू द्या बातमी आली आमच्या एखाद्या चिमुकल्या यशाची.
बरं अजून एक माझ्या काळजाच्या तारा अन धारा माझ्या मुलांना थोडं समजावून घ्या. त्यांना धीर द्यावा लागेल या धक्क्यातून पुन्हा परत यायला. माझं काय होणार आहे हे देव जाणे. त्याने काय मांडून ठेवलंय त्यालाच माहिती.
हर बार जब हमने फूलो को चुना है हमराह मानकर |
कांटे नुकिले मिले है साथ चलने दे दर्द हमेंहर बार |
आता अर्थात ते सुध्दा काळाच्या ओघात हे सगळं विसरतील ही पण फक्त तेवढा काळ सांभाळा त्या मातीच्या गोळ्यांना. सांभाळ करा त्यांच्या त्या प्रतिभेचा, त्यांच्या अद्वितीय भावनेचा, त्यांच्या जीव लावून टाकणाऱ्या बोलण्याचा. असो.
अजून एक अस की आहे तश्याच रहा. दुनियेला दाखवा तुम्ही किती वेगळ्या अन युनिक आहात. शाळा हे फक्त एकच विश्व नाहीच मुळी. जो भेटेल तो प्रेरणा घेईल असेच जगा. सतत हसतमुख अन सकारात्मक रहा. मुळातच महिला ही देवाची ताकत आहे. मला मोह व्हावा की माझी कन्या मोठी होऊन ती अशी व्हावी, तिने असं जगाव.
खूप सारं मागितलंय कारण तसा विषय आहे आणि माफी जर काही चूकभूल झाली असेल कारण मनुष्य आहे परत वेळ आणि संधी मिळो ना मिळो माफी मागायला.
चला एकदाचं पूर्ण करतो लिखाण.

Comments