तुम्हीच सांगा adjust करायचं काय अन किती
तुम्हीच सांगा adjust करायचं काय अन किती
दार नुसती बंद अन बाहेर not allowed चे गेट
वेळ नाही भेटायला अन available चे अपडेट
सपाटा त्यांचा कामाचा नुसता, दिसते फक्त मरणाची घाई
चिमुकले पाळणाघरात , मस्त वृद्धाश्रमी बाप आई
रस्ते कसले भारी खड्डे , लहानमोठे चुकवत चाला
भावनिकतेच्या राजकारणात, विकासावर घाला
योजना नाही सुविधा नाही अजून थांब वर्षे पाच
आले वर्ष पाचवे की येऊ घरी सोडूनी लाज
tanker आला तर पळापळा , धरा भली मोठी रांग
वेळेवर फक्त घंटा मंदिर चर्चची वा मशिदीची बांग
जाहीर सभा कॅम्पेन , होतात खचाखच रोड शो
शेट्टी ,दाभोलकर, पानसरे यांची हीच गती का हो?
पदव्या ही विकतो म्हणे नोकऱ्या बाजाराने
डोनेशन कुठे कुठे साजूक फंडाच्या आजाराने
भिकेसारखा मिळतोय ना हातावरचा रोजगार
डिग्री कमवून ही का बरे हुशारची बेरोजगार
दुष्काळ पडावा सदाच बेबस हताश बळीराजा
अपरात्री पाहणी करी साहेब समितीचा माझा
गारपीट अवकाळी, पंचनामे साऱ्या साऱ्या गावे
क्रूर निर्लज्ज सरकारी १५०-२०० चे चेक नावे
package ही नको त्याला, नको सरकारी फास
समर्थ तो लढवय्या, नका लावू मदतीची आस
कमजोर मोनो, अव्यवहारी मेट्रो,स्मारके कागदी
न सिंचन न धरण , पोसले ठेकेदार हे नगदी
शहरे कसली दाटीची , झोपड्याचे रडगान
विकास आराखडा , घोषणांचे महिमान
बरेच काही मनामध्ये सांगू काय काय रीती
तुम्हीच सांगा adjust करायचं काय अन किती
Comments
Post a Comment