तेच ते, तेच ते, तेच ते

poem on 7/4/15

तेच ते, तेच ते, तेच ते

तोच सूर्य , तोच चंद्र, तोच नभ अन तीच रात
तोच खेळ सारा , तोच लपंडाव , न काही नवीन बात

तीच घाई , अतिघाई , अन घायीघायीचा  प्रवास
तोच देव, तीच फुले , अगदी तोच अगरबत्तीचा वास

तोच रस्ता , खड्डेही तेच, तीच खडकाळ पाउलवाट
तेच प्रदूषण, तीच गर्दी अन कायमचे  धुळीचे पाट

तेच हॉर्न ,तीच ओरडाओरड अन तेच उद्दाम मुजोर लोक
तीच भाषा , उद्धट टोन  अन कमरेखालचे विनोद

तीच पद्धती, तीच शैली , तीच कालची रोजनिशी
तेच बालपण, वृध्दही तेच, तीच भरकटलेली तिशी

तेच चेहरे, त्याच सवयी,तेच नकली से हावभाव
तोच ब्रांड , तीच बॉटल , अगदी तेच बुरसटलेले गाव

तोच पेहराव , तीच पद्धत , तोच काहीसा कायमच वेष
तेच गाव , तोच पत्ता , तोच पिनकोड अन तोच देश

तोच मळा, तेच बान्धव ,तोच अर्वाच्यसा शब्दखेळ
तीच परवड, तीच महागाई,तोच न जुळणारा खर्चमेळ

तेच whatapp , तेच facebook ,तेच सोयीचे तंत्रज्ञान 
त्याच posts , तेच sharings ,तेच शब्दांचे अवमान

तोच tv ,तेच channels , तेच सांस बहू डेली सोप
तेच वागळे , तेच खांडेकर , तीच  अर्णवची बेबंद तोफ

तेच चित्रपट ,त्याच भूमिका , तेच खानदानी फिल्मस्टार
त्याच कथा , तेच climax , तेच पांचट  आपटबार

तोच पसारा , तोच बहाणा ,तीच पुढारी लगबग
तोच उन्हाळा, ती टंचाई, तीच  जनतेची दगदग

तेच बाबू , तीच अनास्था ,तेच आपले -से  सरकार
तेच साहित्य , तेच संमेलन,तेच अभिजात चे फुत्कार

तेच नेते , त्याच घोषणा , तेच आधाराचे ज्ञान
त्याच योजना , त्याच बाबी , तेच नसलेले भारत निर्माण

तोच दिवस, तीच संध्या, तोच रात्रीचा अंधार
तोच सूर्य, तोच किरण , तोच उदयाचा स्वीकार

To be continued.....

Comments