याच साठी केला होता अट्टहास
My poem on the shameful episode of Delhi farmer's suicide 23/4/15
याच साठी केला होता अट्टहास
भर सभेत तुम्ही ठोकत होतात मनसोक्त भाषणे खास
पुत्र धरणीचा आवळीत होता मरणाचा एकटाच फास
त्याला निराश केले कोणी आणी लावली मरणाची आस
कर्जाचा डोंगर कोणी केला अन आवळला सावकारी पाश
झाला राजकारणाचा भाग लागली का वणव्याची आग
फुत्कार तुमचेच विष ही अगदी तुम्हीच विषारी नाग
कुणाला पुळका, कुणाला कसला इथे लोकशाही भास
ढकला मरणासन्न स्वताच, दिवस, वर्ष आणि मास
काय केल आम्ही तुमच, का जीवघेणा आम्हा त्रास
जगू द्या आमच्या रीती, नका हिरावू रे तोंडाचा घास
आहे आम्ही पण माणसे लावू परशुरामी सरसकट रास
नका करू मदत, नको तुमच्या भिकेचा एकही श्वास

Comments
Post a Comment