मी चूक तर केली नाही ना ?


मी चूक तर केली नाही ना ? 28/4/15

भरारी गगनाची सोडून कधी या जीर्ण धरणीचा झालो |
चालत पुढे पुढे न जाणो माझाच मी मागे कधी आलो |
हिशोबाच लागेना साले या मध्ये कमावले मी काय |
धरता धरता पाय परिस्थितीचे खरच गमावले मी काय |
विचार करता वाटे … मी चूक तर केली नाही ना ?

हसता खेळता दिवस अन रात्र माझी होती अव्यक्त |
मित्र मंडळी जाम खुश काही तर होती पक्की भक्त |
येउन वनवासी न जाणे मी खरच काय हो साधले |
गुणगुणणे ना खीळखीळने कोणी काय कसे बाधले |
विचार करता वाटे … मी चूक तर केली नाही ना ?

भेट होती मित्रांना अन बातचीत रोज नक्की होती |
जाणवेल कमी सदाच गाठ मनी खूप पक्की होती |
ना भेट न गप्पा करतो आता ना आठवणी हरवतो |
एकटाच राहुनी सगळेच आता का एकटेच ठरवतो
विचार करता वाटे …मी चूक तर केली नाही ना ?

होते विश्व मोठे पुढती अन साद होती भविष्याची सामोरी | 
मी पाउले मागे आलो अन संधी अजूनही पाहते पाठमोरी |
केली थोडी घाई की जबाबदारीच होती बनला विचार |
का शांतता., नम्रता अन का बनू थोडा मी बनू लाचार?
विचार करता वाटे … मी चूक तर केली नाही ना ?

होता भाव ही आपला अन होती नेहमीच उंच नभावर धाव |
कधीच नाही झाला रे मर्मावर कारण विना खोल सा घाव |
हेच का मला अजून राहिले होत बाबा असल काही शिकायचं |
नासल दुध म्हणे शुद्ध पनीर म्हणून मोठ्याने विकायचं |
विचार करता वाटे …मी चूक तर केली नाही ना ?

बस करू म्हणतो लगेच तरी कधी सोडावे हे बळकट पाश |
लढावेच का लागेल मला न हरता न होता कधीही हताश |
वेळ मारून नेतोय फक्त आणि भरतोय येथे अर्धे दिवस |
वाट पाहतोय जाईल उकाडा अन इंद्रसावे येईल पाउस |
विचार करता वाटे …मी चूक तर केली नाही ना ?
                                        - सचिन गाडेकर

Comments