असे आयुष्य असावे 

poem on 3/4/15

असे आयुष्य असावे 

जन्मावे मुलीरुपी अन स्वागत असे व्हावे 
आई बाप सासू  सासरे नाचत घरी जावे 
मानाने सन्मानाने तीच भविष्य बनावे 
दिवा हि तोच अन पणती तीच असे एक गणावे 

सोडावे गाव परी न रमावे शहरात 
कौतुके  खेळ पुरता ते रहावे मनात 
भरारी गगनाची घेता पाय उभे अंगणात
वेष तोच देश तोच, हवा तीच अंगात 

भेटावे तर आकांताने मित्रांना दोस्तांना 
भकास जग श्रुष्टी वाटे  केवळ ते नसतांना
सोबत त्यांची  अखंडीत रडतांना हसतांना 
फक्त आवाहन अन कविता स्फुरावी शब्दांना 

कुटुंब मग हळ्वेसे करीत जावे पुरते लाड 
स्वर्ग ही थिटा पडावा इंद्राला पडावी धाड 
नात्यांमध्ये गोडवा संवेदना जीवापाड 
वटवृक्षची व्हावा सिंचता  मायेने ते झाड 

दिस प्रत्येक उगावा अन बनावा उत्सव 
शब्द अन कलाकृती अवघी बनावी अभिनव 
महत्त्व तितकेच समुद्रा जीतके अनमोल दव 
मेल घालता समन्वयाचा पुरातन व नव 


घटका मोजताच शेवटचा  ठोका सर्वांचा चुकावा 
पळभर का होईना, ना  एकाचाही आसू रुकावा 
देव ही मग भक्ता करी काकण एक झुकावा 
अभिमाने तो पायी आल्या मुक्तीला मुकावा 

                                       Sachin G.

Comments