बडा कठीण तो स्पर्श दारिद्र्याचा
बडा कठीण तो स्पर्श दारिद्र्याचा poem on 25/4/15
उठतो तो अन चालू लागतो रोजीरोटीला
सोबतीला सहचारिणी बांधून बाळ ओटीला
जिथे ठरवतो मुकादम त्याची रोटी आन रोजी
झुकलेल्या खांद्य्यानी वाहतो सगळीच तो ओझी
सांगेन ते काम कर्म अन दिशा ही बस मानतो
नाही पर्याय कष्टाला , पोटाच्या चिमट्याला जाणतो
ती ही सोबत कामाला त्याच्या अन घास नाही पोटाला
नजर चुकवीत, मान झुकवित गिळते वासनेच्या घोटाला
ती ही मग असहाय पुरती अन तो कमजोर बैल घाण्याचा
गुलाम त्यांच्या टुकड्याचा, आयुष्य बहर घोट भर पाण्याचा
पण तो करीत न तक्रार जातो, जगत दिस अन उरलेली रात
संपवून रात पुन्हा उगवणार, तीच बेबस भयाण क्रूर पहाट
ती तर मुडदा जिवंतपनीचा ,रक्ताचे आसू लपवत जगते
मरण तिचे काय वेगळेसे, रोजच्या जगण्या उपरी असते
शोधला मी आनंद जगण्याचा, त्याचा अन तिचा ही काहीसा
समाधान अन न लोभ स्पर्श , मंत्र जपतात दोघेही असा काहीसा
न मधुमेह न उच्चदाब कधी , त्या फाटक्याश्या जगण्याला
न अपेक्षा न हाव कसली , बिनधास्त न भीत ते मरणाला
हा भास ही झाला थोडा कि, खरच किती मागे तो राहिला
डोंगर ही दुखाचा कसा किती, काळ पक्का त्याने हो साहिला
आम्हा न वाटे काही मग, तो ही तसाच उघडा जगतो आहे
होईल कधीतरी कायापालट म्हणत तुझकडे बघतो आहे
नको भीक त्याला न दया याचना , पक्का हाथ फक्त ठेव
त्याला ही बस पुरेच आहे मान्य,असल्या दगडा मधला देव
Comments
Post a Comment