पुन्हा असली बात होणे आता शक्य नाही …
२/४/१५
पुन्हा असली बात होणे आता शक्य नाही …
झाला का पुरतां साक्षात्कार की उरली अपेक्षा काही
झाला का अंधकार की तेल पणतीत उरले काही
तू नकोस करू अंधार, अन विझवू नकोस दिवाही
पुन्हा असली बात होणे आता शक्य नाही ….
प्रवास दोघांन्चा अन उसासे ओसंडून वाही
फक्त चटके उन्हाचे होतेच लाही लाही
तू हरवू नकोस सावली माझी, नकोस करू निराधारही
पुन्हा असली बात होणे आता शक्य नाही ….
चाललो किती दूर अन फिरलो दिशा दाही
वेदना मनात फक्त अन अश्रू ओसंडून वाही
तू सोडू नकोस साथ, नकोस गमवू आधारही
पुन्हा असली बात होणे आता शक्य नाही ….
शिकू कसा मी जगणे विना तुझ्यां नंतर अन आत्ताही
धडाच म्हणावा आयुष्याचा तोही अन आता हाही
तू अडवू नकोस आजची होउदे मरणाचा स्वीकारही
पुन्हा असली बात होणे आता शक्य नाही ….
Comments
Post a Comment