भेट एक अशी …
भेट एक अशी …
Poem on 16/4/15
तिला पाहतांना काही वेगळस वाटल नव्हत
अगदी काही आभाळ भरून दाटल नव्हत
ती आली आणि एकदम मनात ही भरली
एवढ्या कमी वेळेत माझी बात ठरली
बोलली अगदी मोजकच ती पण अर्थ होता
नाही म्हणजे माझा पक्का त्यात स्वार्थ होता
म्हणाली ती तसा भेटून आनंद झालाय
काय माहित तिला इकडे पुरता पूर आलाय
काय बोलाव मला ही पटकन समजलच नाही
तिला ऐकायचय काय सहज उमजलच नाही
ती मात्र सताड बिनधास्त बोलत होती
मनातले कवाड पुरेपूरसे खोलत होती
मी हो ला हो आणि नाही ला नाही केले
काही कानातून काही डोक्यावरून गेले
मग जात्ते म्हणून तिने हाथ आवरला
काही घडण्या आतच तिने खेळ सावरला
ती निघाली पाठमोरी पाहत मी उभा
ती नजरेआड होईतो तेवढीच मुभा
मग नवस सायासे आला तोही क्षण
पलटली ती अन क्षणात भारवले मन
दुखः झाले थोडे फार, फारसे थोडे
का काबरे कशामुळे, पडले हे कोडे
भेट झाली परी वियोग का देवा
कि वियोगातच लपलाय मिलनाचा हेवा
Comments
Post a Comment