सॉक्रेटीस आणि सत्यम वद | (१७/४/१८ )
सॉक्रेटीस आणि सत्यम वद | (१७/४/१८ )
सत्याचा विजय हो केवळ सत्याचा |
सत्यम वद सत्यम वद |
होता एक विचार सॉक्रेटीस नावाचा |
संघर्ष बनला एकटा अथेन्स गावाचा |
कळला नाही कुणा कुंभ हा ज्ञानाचा |
सत्याचा विजय हो केवळ सत्याचा |
सत्यम वद सत्यम वद |
जावे, भेटावे, शोधावा भाव असत्याचा |
समजावून सांगे तो अर्थ विधात्याचा |
छेडला जणू अहं त्याने मग राजाचा |
सत्याचा विजय हो केवळ सत्याचा |
सत्यम वद सत्यम वद |
ज्ञान हेच म्हणे स्वीकार अज्ञानाचा |
धिक्कार प्रबळ अंधारी जुमल्याचा |
बनला तो आधार त्या नवतरुणांचा |
सत्याचा विजय हो केवळ सत्याचा |
सत्यम वद सत्यम वद |
फर्मान निघाले, आदेश सुटला अटकेचा |
घाट घातला दांभिक फोल खटल्याचा |
पिंजऱ्यात आरोपीच्या विचार सत्तरीचा |
सत्याचा विजय हो केवळ सत्याचा |
सत्यम वद सत्यम वद |
मृत्युदंड दिला, हाती प्याला एक विषाचा |
वाचेल प्राण, घे हात हाती असत्याचा |
मार्ग चोख तो बरा मग एक मरणाचा |
सत्याचा विजय हो केवळ सत्याचा |
सत्यम वद सत्यम वद |
कवटाळला मृत्यू ,न सोडला पथ सत्याचा |
अजरामर झाला विचार ग्रीक इतिहासाचा |
मरण ठरले उपरे, अर्थ हा बलिदानाचा |
सत्याचा विजय हो केवळ सत्याचा |
सत्यम वद सत्यम वद |
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment