सॉंक्रेटीस आणि सत्य

सॉंक्रेटीस आणि सत्य
{अंक पहिला}
(चौक आणि काही लोक उपस्थित आहेत. सॉंक्रेटीस येतो आणि चर्चा होते.)
सॉंक्रेटीस: नमस्कार मंडळी, अथेन्सची प्रजा फारच निवांत आणी सुखी भासत आहे.
प्रजा १: अरे बाबा, तू आहेस ना चिंता करायला आणि विचार करत बसायला.
प्रजा २, ३ : हा हा हा .....याला तर वाटते की सार्या अथेन्सचे प्रश्न त्यालाच सोडवायचे आहेत.
सॉंक्रेटीस: अथेन्सचं माहित नाही पण तुमच्यासाठी काही प्रश्न नक्की आहेत मजकडे आज. देणार का उत्तरे?
प्रजा २: आता विचार बाबा, तू काही तसा सोडणार नाहीस हे ठावूक आहे मला.
प्रजा ३: विचार...विचार... तू विचार जे काही विचारायचे आहे ते.
(सॉंक्रेटीस एक चार्ट लावतो आणि परत चर्चा सुरु.)
सॉंक्रेटीस: हे पहा, आपण हे चित्र पाहून निरीक्षण करत सांगा की हे काय आहे आणि आपण काय पाहता यामध्ये?
प्रजा ४: हे एक पांढरे शुभ्र वस्त्र आहे. ते खूपच छान धुतले आहे.
प्रजा ५: हे वस्त्र स्वच्छ तर आहे पण जरा छोटे भासत आहे.
प्रजा ६: छोटे तर आहेच पण त्यावर एक छोटा डाग देखील आहे.
प्रजा २: हो, तो डाग जरा जास्तच स्पष्ट आहे. तो डाग उठून दिसत आहे.
प्रजा ३: पण हा डाग का ठेवला आहे? एवढे शुभ्र वस्त्र असताना हा डाग का ठेवला आहे?
प्रजा ४: तो डाग मात्र जास्तच घाणेरडा आहे.
सॉक्रेटीस : झाले का निरीक्षण? तुम्हीच सर्वांनी काय काय पाहिले याचा विचार करा. काय आहे या चित्रात? शुभ्रता किती जणांनी पाहीली? किती नकारात्मक विचार आहेत तुमचे? कुणालाही सत्य दिसत नाही पण असत्य लगेचच दिसते.
प्रजा २,३ : मग काय पाहावे आम्ही? डाग तर दिसत आहे ना ? मग तो का नाकारावा?
सॉंक्रेटीस: जशी दृष्टी तशी सृष्टी.  समोर दिसणारे स्वीकारणारी बुध्दी काय म्हणावी?
प्रजा ४,५ : आपणास काय सुचवायचे आहे यात?
सॉंक्रेटीस: मग जे डोळ्याने पाहता तेच सत्य आहे का? विचार करा. धर्म काय आहे? खरा धर्म काय आहे? फक्त वरवर दिसणारेच जगत राहून काय कल्याण होईल कुणाचे?
प्रजा २,३,४,५: हे तू जे सांगतो आहे तर राजाला आवडणार नाही हे तुला माहित आहे ना?
सॉंक्रेटीस: सत्याला कधीच कुणाची भीती नसते. सत्य ते चिरंतन असते आणि ते कुणापुढेही झुकत नाही.
प्रजा २,३,४,५: मग हे असे सत्य आम्हास सांग तू. आम्ही सत्य जाणण्यास उत्सुक आहोत.

{अंक दुसरा}
(ग्रीक सुलतानाचा दरबार, आरोळी आणि सुलतान येतो, दरबार भरतो)
(बा..अदब ..बा...मुलाइजा ..होशियार...सुल्तान-ए-ग्रीस शाही दरबार में तशरिफ ला रहे है| )
सुल्तान: आज ची कारवाई सुरु करावी. 
प्रधान: सुल्तान ए ग्रीस चा जयजयकार असो. सुल्तान आजच्या कामकाजात एक मोठा गुन्हेगार उपस्थित होणार आहे. सम्राट आणि सल्तनत या दोघांविरुध्द ज्याने देशद्रोही कामगिरी केली आहे.
सुल्तान: सम्राट आणि सल्तनत या विरोधी जाण्याची हिम्मत आली कुणामध्ये?
वकील १: सम्राट, आहे एक वेडा , माथेफिरू किंवा मूर्ख म्हणा हवं तर. आम्ही त्यास पकडले आहे आणी तुरुंगवास देखील ठोठावला आहे.
मंत्री १: सम्राट, हा अपराध अक्षम्य आहे. या अश्या अपराध्याला फक्त तुरुंगवास देऊन भागणार नाही. फक्त आणि फक्त देहदंड द्यावा जेणेकरून येणाऱ्या हजारो पिढ्या लक्षात ठेवील सम्राट आणि सल्तनतच्या विरोधात जाण्याचे परिणाम काय होतो तो..
सुल्तान: त्या आरोपीला आमच्या समोर उभे करावे आणि एक एक करत सगळे गुन्हे समोर मांडावे. हा आमचा आदेश आहे.
प्रधान: सम्राट, आपल्या आदेशाची अंमलबजावणी नक्कीच होईल.
मंत्री १: उद्या सकाळी आरोपी  सॉंक्रेटीस न्यायासनासमोर हजर करण्यात यावा.
(दरबार बरखास्त होतो, तिकडे तुरुंगात सॉंक्रेटीस आणि त्याचे सहकारी बोलत आहे.)

(अंक तिसरा)
(सॉंक्रेटीस आणि शिष्य एकत्र आहेत, चर्चा चालू आहे.)
सॉंक्रेटीस: काय आरोप केलेत माझ्यावर?
क्रेटो: सॉंक्रेटीस, सुल्तान आणि धर्मांध धर्मपीठ म्हणतय की तू तरुण नेत्यांना भडकावत आहे. त्यांना विचार करायला भाग पाडत आहेस. तू त्यांवर पाखंड मते लादत आहेस.
सॉंक्रेटीस: तरुणांना स्वतंत्र बुध्दीने विचार करायला लावणे गुन्हा आहे?
शिष्य १: त्यांच्या मते आहे कारण स्वतंत्र बुध्दीने विचार केला ते श्रद्धा, कर्मकांड बंद होईल आणि धर्माच्या नावाखाली चालणारी दुकाने बंद होतील.
शिष्य २: एवढेच नाही ते हे तरून राजाची सत्ता उलथवून टाकतील अशी भीती आहे सुलतानाला.
सॉंक्रेटीस: योग्य आणि अयोग्य ची ओळख करून देणे चूक आहे का? या माझ्या अल्प प्रयत्नाने सुलतान एवढा भयभीत का?
क्रेटो: हे विचार देणे म्हणजे समाजद्रोह आहे म्हणे? यासाठी तुला हद्दपार देखील करतील ते.
शिष्य १: सुलतान म्हणतो की तुम्ही तुमच्या गुन्ह्यांची माफी म मागा आणि सुलतान दया दाखवेल आणि मृत्युदंड न देता हद्दपारी देईल.
सॉंक्रेटीस: हद्दपारी का? माफी माग्ण्यापेक्षा मी मृत्युदंड स्वीकारेन. माफी का? काही चुकलेच नाही. विचार करण्याचे स्वातंत्र्य नसेल तर ते जीवन जगायचे तरी कशाला? एखादा पशु बरा नाही का त्यापेक्षा?
क्रेटो: आजचा तरूण तरुणी जर विचार अभिव्यक्त करू लागली तर तोच खरा विजय असेल तुझा सॉंक्रेटीस.
सॉंक्रेटीस: होय, यासाठीच, सत्यासाठीच मी मरण देखील पत्करेन पण सत्य सोडणार नाही.

Comments