न्याय कि अन्याय

न्याय कि अन्याय

तुम्ही बडी आसामी मग, न्याय देवताही जिथे फेल आहे ।
अटक होणे दुरापास्त तुम्हा राजे, हजर बेशर्त बेल आहे ।

तुडवावे, मारावे कुणा, फटकावे सगळे तुमचे लाडके खेल आहे ।
तुमच्यासाठी नियमच वेगळे , सारे काही आलबेल आहे ।

मोठे तुम्ही , सेलिब्रिटी अन तसेच पक्के समाजसेवी ।
ताईत तुम्ही गळ्यातले आमच्या अन बँकेत करोड ठेवी ।

तुम्ही संकटात आणि जीव टांगनीला देशाचा, नेत्यांचा भावी ।
मंदिरात कुणी मशिदीत ही जातो ,कोणी चर्च मध्ये धावी ।

कोणी हासडतो जिभ, आणी भुंकतो twitter च्या मागे ।
मुर्दाड लाचार बेबस media एकदम होतो खडबडून जागे ।

आम्ही मग ऐकत बसतो दिसभर विणत दोरे अन धागे ।
पुन्हा मोकळा दबंग आमचा भले मग कसाही तो वागे ।

श्रीमंत चतुर व सत्तावानाला जी सदा मनोभावे मिरवीते ।
का तू गोर गरीबा मग हेलपाट्याने गोल गोल फिरविते ।

कल्पना न वल्गना या देशाची राजा मजला ही करवते ।
न समानता तुज कडे , कशाला मग न्याय तू ठरवते

Comments