प्रवास परतीचा..........
प्रवास परतीचा..........
भारावले हेलावले झाले कासाविस मन ।
असह्य अवघड हा प्रवास परतीचा ।
दुखावला चंद्र ही पाहुनी ओहोटी ।
लागलाय लळा त्यालाही भरतीचा ।
तो सूर्य ही तापला अन् झुकला क्षितिजाला ।
प्रेमवेडा तोही या फिरत्या धरतीचा ।
पलिकडे भावनेच्या अन् अवजड बुध्दीच्या ।
उपयोग नाही येथे उपदेश उपरतीचा ।
सुटका की जाच या आठवणी माझ्या ।
फोलका यत्न ठरतो सापेक्ष भवतीचा ।
नुरला देह जणू विच्छीन्न अवस्थेचा ।
या शुष्क आत्म्यास आधार देव वरतीचा ।
Comments
Post a Comment