तूच तू ... तूच तू ...

तूच तू ... तूच तू ...

अबोल भाषा माझी अन जाण मुक्या मनीचे भाव |
फक्त तूच उपचार उपाय,रोक ते आठवणीचे घाव |

तुझीच ओढ अन लळा जीवाला का तुजकडेच धाव |
घे तूच पतवार हाती धडकव किनाऱ्यास ती नाव |

न ओळख न पाळख उरली भलते गजबजलेसे गाव |
बनलीस तूच मंदिर माझे अन तुझ्यावर प्रीती भाव |

काय खदखदते अंतरी सखे आहे ना तुजला ठाव |
का तूच अडखळते मनी सखी दे क्षणभरसा वाव |

                                        - सचिन गाडेकर

Comments