अबला - सबला ?

अबला - सबला ?

सेवा करणारी ही माय  खुद मायेला वर्ष १४ मरणासन्न झुरते ।

कळकळ तिची किती देशाला मात्र ट्वीटर पुरतीच हो उरते ।

 

वाद हा ही नाही कि अतोनात तिचे असे हाल कोणी केले ।

आया-बहिणीच्या सुरक्षेला सरेआम  बकाल कोणी केले ।

 

 घडवले नवे नेते, अगदीच एकदाचे  बदलूनी पाहिले सरकार ।

आकाशी इमले,कागदी योजना,फक्त आश्वासनांची  भरमार ।

 

रस्ते सापळे त्यांच्या मृत्यूचे, बस ट्रेन अधिकृत  छेड छाडीचे ।

डोळे झाक सपशेल होते मग  येथे नाही पडलेय कुणा काडीचे  ।

 

काही  भोगतात काही बोलतात, निडर  काही आवाज उठवतात ।

घेऊन चिरीमिरी म्हणे रक्षक खाकीतले स्वस्तात केस मिटवतात ।

 

घराघरात  झुरतेय ती बिनपगारी मोलकरीण तिचे काम ।

कोणी हुंड्यात कोणी बाजारात खुलेआम मोजतोय दाम ।

 

ती जन्माआधीच मरते अन जगण्या गुलामीही करते ।

जगते,रडते,कुढते अवघडते अन नात्यांमध्ये गुदमरते  ।

 

हो तिलाही अधिकार जन्माचा न कुण्या एका बापाचा ।

थांबव सखी तूच स्वताहून निर्णय सोनोग्राफी पापाचा ।

 

 जाऊदे डंका  चंद्रा मंगळावर हो कल्पना अन सुनिता ।

आभाळ अजूनही खुले आहे स्वप्न उदंड मनी बुनिता ।

Comments