तेच प्रेम तोच भाव
Words for time being in Pune after a long time.....
तेच प्रेम तोच भाव
पाहिले पुन्हा विश्व ते मी, आलो परतुनी अनेक मास
तेच जगत तीच वाटे, होताहेत तेच ओझरते भास
भेटले यार दोस्त मात्र, मनी तेच प्रेम तोच विश्वास
गप्पा टप्पा दंगा मस्ती, रंगले किस्से पुराने खास
सरले झरझर जणू क्षण अन् क्षणात सरले दिस अन तास
गोड अधिकच लागू लागला आंबेरस पुरणपोळीचा घास
भेटाव किती बोलाव किती सहा महीन्यांची होती आस
दूर तसा नव्हताच कोणीही सोबती आठवणींची रास
आता प्रश्न तोची अन् उत्तरे शोधीतो मी संपेल कधी वनवास
भेटीगाठी अन् आठवणी काळजाला नेहमीचाच तो त्रास
येईल गड्यांनो परतुनी पुन्हा मनी बाळगुनी माझी मी अरदास
अपूर्ण अपूरा मानतो मित्रांनो विना तुमच्या मी ही स्वतास
झाला अन् असाच व्हावा दिवसागणिक सुरेख प्रवास
वळून पाहता निशब्द मी, मग काय सोबती आसवे हमखास
Comments
Post a Comment