क्वचितच हो

क्वचितच हो

पाझरते माया नभाची अन फुटतो दगडालाही पाझर

टाळुनी भंग अपेक्षा तेव्हा वाजून जाते पुंगीचे गाजर

क्वचितच हो .....

होते चिंता गोरगरीबाची अन चर्चा मनसोक्त रंगते

पाहूनी हाहाकार सारा मग सरकारी समाधी ही भंगते

क्वचितच हो ....

होतो घात अपघात देशी अन मग जो तो भाषा एक बोलतो

निषेध, मोर्चे, संदेश सभा, जणू देशभक्तीचे विद्यापीठ खोलतो

क्वचितच हो .....

कोमल साजूक मधुरमय मजुरास मालकी बोल

उंच पदी विराजुनी साहेब स्वतचा राखतोय तोल

क्वचितच हो .....

डिग्री झाली पदवी आली चटकन चालत आली नोकरी

मनासारखी जागा, वळणे, पगारी आकडी पाच चाकरी

क्वचितच हो .....

माफी मिळते मूषकाला उदार बलभीम वनराजाची

दाम कसा सन्मानी अन होते योग्य किंमत श्रमाची

क्वचितच हो .....

जन्मते कन्या अन स्वागत तिचे मनी धन्यवाद देवास

देईल तो कष्टांच्या हाती जिथे  हा विश्वास प्रत्येकास

क्वचितच हो .....

Comments