गत वर्ष माझे poem on my birthday 3/5/15

गत वर्ष माझे poem on my birthday 3/5/15
 
सांगू कसे काय घडले अन कसे वर्ष एक झरझर गेले ।
एक नाही अनेक नवे मी अनुभव गाठीशी पक्के केले  ।
 
धन्यवाद देतो मित्र इष्ट नातेवाईक अन हितचिंतकांना ।
मानू किती आभार तुमचे अन तसे अधिकार ही किती शब्दांना ।
 
होते अपूर्व आणी अप्रतीम बनुनी स्मरणातले गत  वर्ष ।
याच वर्षी झाला मजला माझ्या छकुल्या स्वरुपाचा स्पर्श ।
 
तिच्याच अवतीभवती सारे भैय्या भाभी बाबा आजी उत्कर्ष ।
हालचाल, हरेक भाव तिचा कसा फक्त होता ओतीत हर्ष ।
 
ती असीम कृपा तुझी परमेशा दिलेस  कन्या रत्न मला ।
जाण पुरती होतीच माझ्या मनोकामनेची १०० % तुला ।
 
झाले मनोरथ पूर्ण खरे  अन लाभले पितृत्व  मला  ।
होतो अन अधिकच झालो, जबाबदार एक बाप भला ।
 
सुटले बरेच काही माझे, जसे गोडात लपले भास कडू ।
डोळ्यात अजूनही ताजे ते,  सोडतांना मानसी चे रडू  ।
 
 जीव कंठाशी आला होता कैसे सोडवले जाणे  देव खरा ।
रोकण्याचा अश्रूंना ठरला प्रत्येक माझा यत्न अपुरा ।
 
मिळाले बहुत काही अन प्रवासी शिकलोही बरेच काही ।
खोलून बाहू उभ्याच होत्या नेहमीच दिशा मग  दाही ।
 
दिशा नवी मग रंग नवे, पुढे उभे ठाकले विश्व नवे ।
नवी उमेद नवे सवंगडी नवे  झेपावणारे संजीवन थवे ।
 
परतुनी आलो वर्षांनी घरी अन घरपण खरे घराला ।
आस लागली होती कधीची याच गगनाची धरतीला ।
 
होऊ लागला प्रवास त्यांच्या मग साक्षीने जोमाने  ।
देव जणू देव्हाऱ्यातल्या समक्ष पुजू लागलो नेमाने ।
 
घेतले धडे नवे घेतोय समजुनी नव्या नव्या मित्रांसवे ।
चाललोय पाऊले दोनच अबतक ,दूर तक जायास हवे ।
 
होय, न संतुष्टी मला इथे, न कधी कधी विश्राम हवा ।
चालेन म्हणतो अटकेपार अन शोधेन रोज मार्ग नवा ।
 
मी चढेन अजूनही पर्वतरांग अन तुडवीन डोंगरकाठ ।
दे फक्त नम्रता अंगी अन राखू दे सदा  प्रेमाची गाठ ।
 
आग पायात राहू दे परमेशा अन मिठास अशीच मुखात ।
हसू टिकू दे असेच अन व्हावे सहभागी तू दु:ख सुखात

Comments