घे कवटाळूनी मजला .....

आज Mother’s day… तसा मातृदिन (पोळा) या दिवशी आपली पद्धती मातेचे महत्त्व समजावते. तथापि, त्या माउलीसाठी सारे दिवशी थिटे पडतील हे नक्की. सहज जुन्या वह्या चाळताना 28/11/07 ला लिहिलेली ही छोटी रचना सापडली.  प्रत्येक मातेला मनापासून अभिवादन ...
सर्व SUPERMOMs  यांना हैप्पी मदर्स डे !!!!!!!                                 
घे कवटाळूनी मजला .....                
आस नव्या जगताची  क्षणात विरून जाते |
घे कवटाळूनी मजला  पुन्हा उराशी माते |

तू सोसल्या मात्र वेदना अन यातना |
माझिया मनी नेहमीच्या मुक्त भावना |
विना तुझ्या ही मुक्ती आई बंदिवास बनून जाते ....
घे कवटाळूनी मजला  पुन्हा उराशी माते |

प्रवास सुरु झाला एकट्याने चालण्याचा |
वहिवाट सोडूनी ती नवे मार्ग खोजण्याचा |
विना तुझ्या बोटाच्या आई वाट अडखळून जाते ....
घे कवटाळूनी मजला  पुन्हा उराशी माते |

प्रयत्न मी ही केला स्वत:च बोलण्याचा |
शब्दभांडार अवघे स्वतःच खोलण्याचा |
विना शिकविता तुझ्या आई वाचा बडबडून जाते ....
घे कवटाळूनी मजला  पुन्हा उराशी माते |

तू  दिलास जन्म म्हणून घाट नटण्याचा |
अधिकार दिलास तू हसण्याचा रडण्याचा |
विना तुझ्या काळीज कसे आई धडधडून जाते
घे कवटाळूनी मजला  पुन्हा उराशी माते |

                                ---सचिन गाडेकर

Comments