थोडंस मनातलं ...... १०/५/१६

थोडंस मनातलं ...... १०/५/१६

व्यक्ती आपल्या क्षमता ओलांडू शकतो, स्वतः आखलेल्या लक्ष्मणरेषा पार करू शकतो हे सांगून गेलं मागचं वर्ष.

पूर्वार्ध

सहज सरत्या वर्षाचा लेखाजोखा मांडावा म्हटल आणि सार काही समोर उभं राहील. वर्ष फार गतिमान होत. त्यात अनेकविध नवीन भूमिका निभवाव्या लागल्या हे ही खरे. अगदी विचार हे केला नव्हता असे अनेक पैलू निर्दशनास आले. स्वत: हे सगळ काही करू शकतो ही जाणीव आणि काही दुर्बलतांची आलेली प्रचीती सुध्दा महत्वाचीच. शिकत राहणे, नवीन काहीतरी करीत राहणे, नाविन्य स्वीकारणे ई. गोष्टी पुस्तकात न राहता समोर आल्या अन त्या जीवनाचा भाग बनल्या.

या वर्षाच्या पूर्वार्धात फार धावपळ झाली. बरेच बदल अनुभवास आले. खूप काही जवळून पाहिले या डोळ्यांनी. अर्थात त्याचा उपयोग हाच की काय करावे अन काय करू नये हा बोध. (हे ही तितकेच महत्त्वाचे) समस्त वेळ हा संयम, शांतता, अक्रोध वगैरे सांभाळत गेला. स्वत: प्रतिक्रिया देणे दूरच तर इतरांची मने, मानसिकता समजत, थोडासा आधार देत पुढ जाव लागले.

या व्यस्त वेळेत सर्वात महत्वाचे नाते गुंफत होता तो काळ. होय....मैत्री, सख्य, मित्रत्व, फ्रेंडशिप ई. नावे देतात लोक त्याला.  कसे?, काय?, कधी?, का बरे?, कुठपर्यंत? हे सारे प्रश्न फोल ठरतील अशी ही अवस्था. पण या अवस्थेला काय नाव द्याव? नावात काय आहे? असे भले शेक्सपियर म्हणत असेल पण आम्हाला नाव ही मिळाले ते भन्नाट ....SHIRDI GANG ...अबब !!! काय हे नाव? कसलं हे नाव? अगदी काही सुचल नाही म्हणून दिल कि काय अस वाटावं हे नाव.

तसे सारे जायचो एकच बस ने. कोणी प्री सेक्शन, कोणी पी आर ओ, कोणी पॉली चे, कोणी कॉर्डीनेटर (सर... तुम्ही तेव्हा कॉर्डीनेटर होतात.) मला आठवत की माझी अन प्रियांकाचा अकॅडेमी चा प्रवास एकाच महिन्यातला. सर तर परफेक्ट...सुप्पू च काय सांगता...पठाण भाऊ तर आवाज नुसता, नुसता धूर, नुसता राडा ..

मला खूप जास्त भीती होती सिम्बी सोडण्याची, चार वर्षे, त्यात मी हा असा, नुसती मस्ती, मजा, मित्र, सर्कल, पार्टी, चहा अन बरच काही. हे सगळ कोण सहन करणार? कोण हे सगळ निमूटपणे स्वीकारणार ...असे अनेक प्रश्न मनात होते. पण आज एक दिवस ना भेटेल तर कुछ तो गडबड है चा फील येतो.  अगदी एखादा बाय ना म्हणता गेला तर चुटपूट लागावी इतकी attachment !!! एकमेकाचे कुटुंबीय तर केव्हांच आपले होऊन गेलेत.

तसंही माझं एक वर्षाच पारड तोलाल तर हा ग्रुप खरी कमावलेली संपत्ती. खरी झालेली वाढ. खरा झालेला नव्या विश्वाचा साक्षात्कार...

चला बाकीचा अध्याय परत कधीतरी वेळ मिळाला की.......


Comments