पुण्यनगरी,प्रश्न अन कल्लोळ
पुण्यनगरी,प्रश्न अन कल्लोळ २२/५/१६
परवाच आगमन झाले पुण्यात अन धडाका सुरु केला वाचनाचा. ठरल्याप्रमाणे टाईम टेबल बनले. मनापासून ठरले की या संधीचा पुरेपूर लाभ घ्यायचा. बौद्धिक अभ्यास तर बहानाच आहे जणू. मन तर पुण्यात जावे म्हणून उछलत होते. अर्थात रिसर्च चे कामही तितकेच मोलाचे. या सगळ्यात पुन्हा एकदा त्या विश्वात जाणे, त्या रस्तावरून जाणे, त्या त्या स्पॉटवर क्षणभर विसावून मनाचे समाधान करणे खूप काही देऊन जाते. पदव्युत्तर अभ्यासक्रम अन ते कॉलेजचे दिवस, तद्नंतर सिम्बीचे रुटीन जॉब प्रोफाईल अन जबरदस्त मित्रविश्व. या मागच्या सहा वर्षात घडलेला हा प्रवास हरघडी मनात जुनी ओल जागा करत असतोच. अगदी सांगायचं झालं तर तो पी.एम. टी. चा बस रूट पास, ते जुन्या सांगवीतले खान्देशी मेसचे जेवण सगळ काही अजूनही ताजे ताजे...
त्यात भर पडते ती मंथनाची. रोजच्या रुटीनमधे असा विचार क्वचितच मनात घर करतो. एकाच दिवसात चार चार मित्र जे सहकारी होते,जे खऱ्या अर्थाने कलीग होते, मार्गदर्शक अन काही अजूनही प्रेरणास्रोत आहेत. शैक्षणिक बाबी अन त्यांची मर्यादा, भविष्यातील गंभीर वाटचाल, येणारे धोके,येणाऱ्या कमकुवत बाजू न अजून बरच काही चर्चेल गेलं. तब्बल एका वर्षाने झालेली भेट म्हणजे लेखाजोखाच हो. झाडाझडती घेणे, प्रतिप्रश्न अन मौलिक सल्ले तर मुख्य कार्यभाग. सचिन हे बघ.....म्हणत सुरु केलीली चर्चा लेखन, कविता, भाषणे, सेमिनार अश्या अनेक मोघम विषयाकडे जात जात रुळावर येऊन मर्माघात करू लागतात. हे कधीकाळी एकत्र काम केलेले, रिसर्च हे चाप्टर एकमेकांकडून तपासून घेतलेले अचानक समीक्षक बनतात अन बरच काही नाविन्य ऐकायला मिळत.
यातले काही तर उत्तुंग भरारी मारताय करियर मध्ये पण सर्वात महत्वाच म्हणजे एकमेकांत असलेला रिस्पेक्ट, आदर अन प्रचंड प्रोत्साहन देण्याचे कसब. आपल्याच क्षेत्रातला कोणी पुढे गेला वा चालला तर ईर्ष्या वा नकारात्मक प्रतिक्रिया साहजिकच पण ते सुद्धा अपवाद इथे. गेल्या सत्रात काय केलस अन काय अजून आहे पुढे हे जणू गप्पा मारता मारता कळून गेलं. आपलं स्वतःच एक नेहमी म्हणणे असते की खूप व्यस्तता आहे, वेळेचा प्रोब्लेम आहे, खूप प्रेशर आहे, वगैरे वगैरे... पण आपल्याच प्रोफाईलचा, डिग्री चा, बरोबरीचा अन सोबत काम करणारा जेव्हा गगनभरारी करू शकतो, सगळा लवाजमा (नोकरीविषयकच बरे हो..) कामाचा डोलारा पेलवत नवनव्या उंची गाठत, कसलाही आळसाचा लवलेश न येऊ देत क्रमण करू शकतो मग तेरे को क्या प्रोब्लेम है रे बाबा अस मन चपराक देऊन जात. बर हे सगळ कर असताना तेच साधपण टिकवण कमालच.
मग मन भुंगा थेअरी सुरु करत की स्वतःच्या आखलेल्या मर्यादा खरच मर्यादा आहेत की आळसाचे उदातीकरण?व्यस्ततेच कारण कमजोरीच भांडवलीकरण तर नाही ना?स्वत:च्या ना रुंदावनाऱ्या कक्षा कोणी रोखल्यात? अरे अभी तो नापी है 2 गज जमीन वगैरे फक्त चित्रपट अन डायलॉग मधेच का? हे अस जाळ आपणच उभे करतो का आपल्या भोवती? डंडा घेऊन विचारलंच पाहिजे की क्या नया कुछ किया या नही? दिवसागणिक झीझणारा देवाचा दगड पण आजकाल कृत्रिम लेपाने सावरला जात असताना आपण मात्र त्याच कर्मकांडात अडकणे किती योग्य? थोडक्यात काय तर स्वत:च्या क्षमता अन शक्ती चा आवाका अजून वाढवणे हीच या दोस्त लोकांची दीक्षा.
स्वतःला अनिवांत अन अस्वस्थ ठेवण तेही शैक्षणिक अन वैयक्तिक ग्रोथ साठी अनिवार्य अन अटळ सत्य.
चला अजून निम्म्या महाभागांना भेटायचं आहे. अजून बरच काही ऐकायचय ...
Sachin Gadekar
Comments
Post a Comment