तू अन मी अन वेडेपण
तू अन मी अन वेडेपण ....(५/६/१६ )
काहीतरी वेगळच नातं उभं केलय गेल्या काळात तू |
बस येईल सुवर्णवेळ परत ती सागंत वाट पाहतोय मी |
देतेस दूषणे तोंडभरून अपमानजनक सदाच तू |
बस भूषण त्या दूषणात शोधत आनंदतोय मी |
झिडकारतेस अन फटकारतेस वारंवार मजला तू |
बस शब्दांना तुझ्या फुले मोहक सुकोमल मानतोय मी |
भडकतेस अन चिंध्या चिंध्या करतेस काळजाच्या तू |
बस गुस्से में छुपा होता प्यार असे मनी म्हणतोय मी |
फेकून देतेस अन नाकारतेस गिफ्ट्स सारे माझे तू |
बस योग्य तुझ्या नाही ते म्हणत नवीन गिफ्ट शोधतोय मी |
रागावतेस अन क्षणभर ही नजर भिडवत नाहीस तू |
बस संस्कारचे भाग आहेत ते मनाला समजावतोय मी |
दुखावतेस खूपदा अन मनवत ही नाहीस मला तू |
बस संधी देतेस मला अनाहूत तूच अस ठरवतोय मी |
फोन, मेसेज तर दूर आठवण सुद्धा काढत नाहीस तू |
मी मात्र विसरू देणार नाही अस निरंतर चालवतोय मी |
मी शस्त्र सारी म्यान केलीत तुझ्यापुढ अनेकधा |
बस वार झेलण्यात तुझे विजय माझा मानतोय मी |
आपण फक्त मित्र आहोत रे म्हणत धागा तोडतेय तू |
बस मैत्रीतूनच वाट प्रेमाची एकट्यानेच मस्त गुंफतोय मी |
समजावत मला, सागंत मला शहाणा बनू पाहतेय तू |
बस वेडेपनातून या आता अजूनच वेडा बनतोय मी |
--सचिन गाडेकर
Comments
Post a Comment