भीती वाटते .......

भीती वाटते .......

देश माझा असा अन गाव असा माझा 
जो तो आपल्या मनाचा राजा 
इथे प्रजा व्हायला आता भीती वाटते 

सत्य बोलाल तर मिळणार टोला 
जबाबदारी म्हणे दुसऱ्यावर कोला 
इथे जबाबदार व्हायला आता भीती वाटते 

आरोपी कोण अन कसली हो सजा 
काहीही करा नवे तर गणितच वजा 
इथे आता बेरजा करायची आता भीती  वाटते 

अत्याचारांचे जंगल  अन जंगली या रीती 
नपुन्सकाची भाषा अन पळकुट्या नीती 
इथे नीतिमान व्हायला आता भीती वाटते 

खेळ झालाय जणू रोजचाच बलात्कार 
किती अन कसा करणार ती निर्भया प्रतिकार 
इथे स्त्री जन्माचीच आता भीती वाटते 

बोलाव लागेल खूप काही कराव लागेल 
एक न एक दिवस खरच देश माझा जागेल 
पण इथे होणाऱ्या  उशिराचीच भीती वाटते 

Comments

Post a Comment