सावर रे ……

My poem on the untimely rain that caused disaster...

सावर रे ……


आक्रोश करू , पाय धरू , काय करू रे घना
मातीमोल सोन केलस , तरसावले जीवना


सावरला तो बळीराजा , पुरता फक्त एक क्षणा
उघडे पोट होतेच . आता मोडला पाठीचा हि कणा


बाटली लाही पैसे नाही , भीक मागतो जना
उपाशी पोरबाळ , अन महागाई काढती फणा


उध्वस्त करू , आत्महत्या कि संपवू जीवना
तू देव होतास, का झालाशी कृरतम रावणा


कसा शांत करू चोहीकडे नुकसानी वणवा
दाखव माया , परी वा स्वतास राक्षसाची म्हणवा


मी राहीन उभा मोडता मोडता , न दुख्खाची वाणवा
बघ विसरेन तुलाही एकदाचा . ठेव तू ही जाणीवा


ये धावून तू , राख लाज , सावर रे मानवा
मी ही विसरेन , पुन्हा लढेन , खेळेन खेळ हा नवा


Comments