देतो देतो, आज देतो, उद्या देतो १४/५/१८
देतो देतो, आज देतो, उद्या देतो १४/५/१८
होते सकाळ आणि कॉल येतो |
जो तो उठून मग तोंडसुख घेतो |
झालंय वर्ष आता मनावर कधी घेतो |
देतो देतो, आज देतो, उद्या देतो |
फोनवर फोन आणि धारीच लिंबू देतो |
एक दहा मिनिटांत परत फोन करतो |
मग ना फोन ना कसला वादा होतो |
देतो देतो, आज देतो, उद्या देतो |
भेट घेतो, फिरवतो आणि वायदा होतो |
वायदा होता आज हे जो तो सांगतो |
या आणि घ्या हा चेक जोमात सांगतो |
देतो देतो, आज देतो, उद्या देतो |
बँका फिरून मग चेक माघारी येतो |
चेक करा जमा मग ऑनलाईन करतो |
दिवसामागून दिवस असाच जात राहतो
देतो देतो, आज देतो, उद्या देतो |
स्टाफ दर माही अडव्हांस फॉर्म देतो |
गरजवंत आहे का तपासून तो पाहतो |
या सोमवारी नक्की कॅश हातात देतो |
देतो देतो, आज देतो, उद्या देतो |
येतो आणि जो तो ओक्साबोक्शी रडतो |
हात जोडतो कोणी पाया देखील पडतो |
बिनधास्त राहा या सोमवारी वनशॉट देतो |
देतो देतो, आज देतो, उद्या देतो |
रोजचे खोटे, धादांत खोटे फक्त बोलतो |
खड्डा एक भरण्या अजून एक खोदतो |
मिटले आहेत प्रोब्लेम आता वर्षभर सांगतो |
देतो देतो, आज देतो, उद्या देतो |
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment