Happy Birthday Dear Brother Vishal Salunkhe!!!

Happy Birthday Dear Brother Vishal Salunkhe!!!

आपल्या ग्रुप मधील सर्वांत कष्टाळू , अभ्यासू, मैत्रीची जाणीव ठेवणारा विशाल माझा मित्र बनला 2008 साली.
आज मागे वळून पाहताना तुझा फार अभिमान वाटतो रे.
एम. ए. ला एकत्र आलो, रूममेट्स - क्लासमेंट्स झालो.  थोड्या मार्क्सचा फरक असेल इकडे तिकडे पण तुझे कष्ट मात्र वाखानण्याच्या जोगेच होते. प्रयत्न करत राहायचं हे तुला माहीत होतं. वडील नाहीत आणि घरात तू मोठा या जबाबदारीत देखील तू खूप मनाला समजावयाचा आणि अभ्यास करायचा. रात्री दोन दोन पर्यंत जागत बसायचं तुला सवयीचं झालं होतं. आज हे करू, उद्या ते झालंच पाहिजे हे सतत बिंबवत राहायचास तू.

तुझा सर्वात मस्त गुण म्हणजे तुझा स्वभाव. अरे, तू असलास की कसे काय हास्याचा फवारा उडतो हे कळतच नाही. तुझा सेन्स ऑफ ह्युमर तर अफलातून आहे. एकदम सेन्सिबल जोक करत  सर्वांना हसवायचा. मला देखील भंडावून सोडत असत तू प्रश्न विचारून. तुला जर एखादी गोष्ट खटकली तर बिनधास्त मला राऊंड मारताना बोलून दाखवायचास तू. नेहमी मोठा भाऊ मानलंस आणि मी अनुज.

तू पुढे हैदराबादला गेलास. PGDTE पूर्ण केलं. एवढयावर न थांबता एम. फील. ला ऍडमिशन घेतलस. ते माझ्या बरोबर घेतलंस आणि अगोदर पूर्ण केलंस. तुझी कामाची गती पाहून मला खूप वेळा इंस्पायर केलंस तू मित्रा. तुझा एक एक chapter माझी गती वाढवून गेला हे कबूल करायला काहीच हरकत नाही. तुझा करत राहणे हा स्वभाव आहे. थेट फोन करतोस आणि मनमोकळं मांडतोस. 

पुढे नेहमी आपण संपर्कात राहिलो. तू अकलूज, मी पुणे, पुढे मी शिर्डी ला शिफ्ट झालो. मला खात्री आहे की तू देखील अजूनही तेच नाते जपतोस , अनुभवतोस जे मी आजही अनुभवतो. ये बात ही कुछ और हैं। हा Out of sight - out of mind चा फंडा आपल्या कोणाच्याच नात्यात दुरावा आणू शकला नाहीय हेच विशेष नाही. आजही सिंहगड ट्रिप, चहाचे ठेपे, अभ्यासाचे रिविजन सगळं कसं स्पष्ट उभं राहतं डोळ्यासमोर.

पुढे तू सेट साठी अभ्यास करत राहिलास. दर वेळी थोड्या मार्काने तू फेल व्हायचास.  2010 ते 2016-17 पर्यंत तू धीर सोडला नाहीस. कित्येक वेळा आलेले अपयश तूला हरवू शकलं नाही आणि तू दोन वर्षांपूर्वी ते स्वप्न देखील पूर्ण केलंस. तुझा फोन आला आणि मला स्वतः पास झाल्याचा भास झाला रे. कष्ट कधीच वाया1 जात नाहीत आणि तू त्याच मूर्तिमंत उदाहरण. सेट पास झाल्याशिवाय बोहल्यावर नाही असा काही निर्धार होता काय रे? खूप अभिमान वाटला तुझा राव.

एवढ्यावरच तू थांबला नाहीस, एम.ए., PGDTE, एम. फील. , सेट , आणि आता पी. एच . डी. पूर्ण करशील तू. अरे, एवढा मोठा झालास तरी जमिनीवर. आठवणीनं फोन करतोस, वेळ देतोस हे आपले नाते अजून घट्ट करते.  एक मित्र म्हणून तुझा जाम अभिमान आहे.  सांगवीत जरी गेलो तरी फक्त आठवणी पोट धरून हसवतात आणि टच डोळ्यात  पाणी देखील आणतात. नंबर 1 यारी हाय साली.

तू असाच पुढे जात रहा. लवकरच डॉ. विशाल म्हणून फोन करेल मी. येणाऱ्या कोणत्याही संकटाला तू मात देशीलच हे सांगायला नको. असाच हसतखेळत रहा. दिलखुलास रहा.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।

Thank you Lord for this gift.....

Comments