डेथ विश आणि ब्रूस विल्स १/६/१८
डेथ विश आणि ब्रूस विल्स १/६/१८
सिनेमे पाहतांना ते फक्त मनोरंजन म्हणून पाहावेत असे असले तरी डोक्यातील किडा फारसा शांत बसत नाहीच मुळी. गेल्या आठवड्यात एक डेथ विश नावाचा हॉलीवूडपट पहावयास मिळाला. कारण फक्र ब्रूस विल्स. हा हॉलीवूडचा hitman. त्याची Die Hard film series खूप आवडीने पाहिली आहे आणि मस्त काम असते या नायकाचे. त्याची बलदंड शरीरयष्टी आणि चेहऱ्यावरील हावभाव पैसे वसूल करतात. शेवटी नायकच तो नाही का?
या डेथ विश चित्रपटाची पटकथा तशी फारच कमजोर आहे. आपल्याकडे जसे एखाद्या हिरो ला साईन करून मग कथा लिहिली जावी किंवा गाणे, फायटिंग घुसावावी असे काहीतरी प्रकार दिसतात. हॉलीवूडसुध्दा या नायकांचा बांधील आहे हे स्पष्ट होते. एक नामवंत सर्जन इमानइतबारे नोकरी करतो आहे. त्याला आजूबाजूला होणारे अपराध, दरोडे किंवा गोळीबार हे दिसत आहेत पण तो त्याच्या कामात आणि कुटुंबात व्यस्त आहे. त्याला रोज नवनवीन लोकांना उपचार करावे लागतात पण त्याला जाणीव आहे पोलीस यंत्रणेच्या कमजोरीची.
इथे हा चित्रपट अमेरिकेतील बंदूकराज यावर जास्त भाष्य करतांना दिसतो. एक विकसित देश आतून किती भेदरलेला आणि असुरक्षित आहे याचे हे उदाहरण. प्रत्येक व्यक्ती आत्मसुरक्षा या कारणाखाली लायसन्स गन घेतो. याचे विघातक परिणाम देखील अमेरिका भोगत आहे कारण शाळा, कॉलेज किंवा कॉफी शॉप गोळीबाराचे निशाण बनतात. कितीतरी निष्पाप बळी जात असून देखील arm act सुधारला नाही असे समजते. हा सर्जन नायक जागा होतो जेव्हा त्याचे कुटुंब लक्ष्य होते. पत्नी अश्या एका बंदुकधारी दरोडेखोर घरात लूट करत असतांना ठार होते तर मुलगी अंथरुणावर खिळून रहावी एवढी जास्त जखमी होते. स्वत:वर बेतते आणि हा सर्जन नायक खडबडून जागा होतो, पेटून उठतो आणि निर्धार करतो काहीतरी करण्याचा. या सगळ्याचा बंदोबस्त करण्याचा.
इथे या दोन tagline वापरत हा सिनेमा प्रेक्षकांसमोर ठेवला गेला आहे. They came for his family. Now he's coming for them आणि How Far Would You Go To Protect Your Family?
सहजच वाटून गेले की अरेच्या, अश्या पठडीतील सिनेमे तर बरेच आहे आपल्या लाडक्या बॉलीवूडमधे. मागे तो अक्षय कुमारचा गब्बर घ्या, सनी देओल चा बिग ब्रदर घ्या. स्वत: कायदा हातात घेत हा नायक समाजात नसबंदी चालू करतो गुन्हेगारांची. अगदी बंदूक विकत घेण्यापासून तर त्याचे विडीयो पाहत ट्रेनिंग घेत रात्री बेधडक होणारे गुन्हे रोखू लागतो आणि थेट गुन्हेगारांना यमसदनी पाठवतो.त्याची खास धास्ती उभी राहते. लोक त्याला हिरो मानू लागतात. पोलीस गुन्हेगारांना सोडून त्याचा पाठलाग चालू करतात.
आता इथेच साम्य आढळते काही कॉमन गोष्टींचे. क्रीटीसिझम च्या अनुषंगाने बोलायचे झाले तर Carl Jung याचे Collective Unconscious चे. मानव समूहात कितीही वेगळेपण असेल पण काही धागे अगदी समबंध आहेत. आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू पण काही गोष्टी समानच आहेत असे युंग सांगतो. याच धाग्याला धरून विचार केला तर पटले की रेडीओ आणि टीवी ही माध्यमे रोजच्या रोज नाकाम भासणाऱ्या पोलीस यंत्रणेपेक्षा या नव्या तारणहार हिरो ला सपोर्ट करतात आणि दिवसरात्र त्याचाच टेप चालवतात. हजारो केसेस ने पछाडलेले पोलीसदल कसे निकम्मे आणि अपुरे आहेत हे सांगत या नवीन this Deadly avenger is a guardian angel असे म्हणत त्याला स्वीकारतात देखील. आपल्याकडे बिग ब्रदर आणि गब्बर सिनेमात देखील असेच घडते.
If a man really wants to protect what's his. He has to do it for himself. हे असे स्वत:ला पटवत तो फेमस होतो. त्याला थेट शोध घ्यायचाय त्याच्या पत्नीच्या मारेकरीचा आणि ते तो करतो देखील. नुसता गोळ्यांचा आवाज आणि एकमेकावर हल्ले-प्रतिहल्ले होतात. शेवटी नायक कुठेही न सापडता त्याला अभय का दिलं गेलंय हे अनाकलनीय आहे. बॉलीवूडच्या सिंघम २ च्या शेवटी नायकाला अभय दिले जाते अगदी तसेच. पुन्हा एकदा Carl Jung आठवतोच.
असो, दोन तास एका जागेवर खिळवून ठेवत केलेलं मनोरंजनच चांगले असावे या पोस्ट मूवी गुंतागुंतीपेक्षा. ब्रूस विल्स जरा जास्त अपेक्षा आहेत आम्हा चाहत्यांच्या हे ध्यानात असू द्या आणि हो तेवढं सिनेमाचं नाव डेथ विश का ठेवलं हे देखील कळवा.
---- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment