सांग विठुराया सांग तुझ्या काय मनात आहे ?

सांग विठुराया सांग तुझ्या काय मनात आहे ? 2/6/15

पोहोचेल जो तो पैलतीरी का मी अजूनही प्रवासात आहे ?
सावली चोहीकडे घनदाट अन मी मात्र रणरण उन्हात आहे .


हसतोय जो तो उन्मळून येथे का मी घोर रुदनात आहे ?
भिडलाय जो तो गगनाला मी मात्र अडकलो घरात आहे .


यशकीर्तीचे तेजलोळ भवती का मी फक्त कोमात आहे ?
चंद्र मंगळी विज्ञान जाहले मी मात्र मग्न होमहवनात आहे .


स्थैर्य्याचे घाट चोहीकडे का मी हेलावत बुडत्या डोहात आहे ?
सुखावह सोडून निश्चिती मी मात्र आनंदी बदलात आहे.

Comments