होतात चुका अनवधानाने.....

होतात चुका अनवधानाने.....

 
पुतळा चुकीचा जो तो इथे जसा अधिकार जन्मापासून |
परिस्थिती कधी, गडबड घाई, नेहमीच उभी आ वासून |

 
होते चूक मग सवयीची का म्हणूनच बडगा शिक्षेचा |
पोट भरावे जैसे कष्टाने, का सोपा नाही पर्याय भिक्षेचा |

 
व्हावी माफ ही सहजपक्षी प्रेमाने पहिलीवहिली आहुती |
नकोच भस्मस्थानी पडाया तकलादू दो दिवसाची राहुटी |

 

हवा समजेचा डोस बरा, ठरावी मात्रा ही मग मधुरमयी |
द्यावा दिलासा भरवसा ही लक्षात असावे रंग गुणमयी |

                                     - सचिन गाडेकर

Comments