ऑनलाईन ......  ऑफलाईन ........

ऑनलाईन ......  ऑफलाईन ........
स्टेट्स तीच बघतो रोज अन न चुकता लास्ट सीन |
हिशोब सगळा जमला, कधी ऑफ कधी ती ऑनलाइन |

करावे काहीतरी झकास कमेंट बा वाटते करावे लाईक  |
लोगो अवेलेबल चा माझा,मी तर इथलाच स्थायिक |

लागलीच दर्शन पहिले तिचे, नेटवर्किंग असे अतूट |
सेव करावा फोटो हरेक अन मनात म्हणावे क्युट |

चार्गिंग करावी नित्याची अन सोबतीला जड पावरसेवर |
लिहावे, पोस्ट करावे अन म्हणावे तिचाच सगळा फेवर  |

एडिटिंग पेजचा साज कसा सांगू मग रंग तुझ्यात भरतो |
डीलिट करावे मन सावरून एक,लगेच डाऊनलोड दुसरा करतो |

पेज विझीट हजारदा माझी अन दुर्मिळ भेट तुझी समोरसमोर |
जणू भरल्या पावसाने झोडपावा बहरलेला हिरवा आंबेमोहर |
                     
    -सचिन गाडेकर 

Comments