सोसेना विरहाची धग......
सोसेना विरहाची धग...... ४/६/15
मळभ दाटले चहूकडे, की हे भास माझ्या अंतरीचे |
उत्त्पती लय एकची झाले, आता प्रवास दिगन्तरीचे |
हळुवार झाली वेगळी, न कळली कधी मी विसरलो वाट |
सोडली ना मी, ना तू मग, कशी सैल झाली जन्माची गाठ |
बघ पालवी नवी नवी अन आतुर कृष्ण दाटलेले ढग |
बेचैन मी, कासावीस मी, तुला ही सोसेना विरहाची धग |
कारणे शोधू की देऊ हलफनामे आपल्या दुराव्याची |
की नाही आस्था ना रोष ना ना गरज येथे पुराव्याची |
दुर्मिळ झाले बोल तुझे, झाला दुर्मिळ नात्याचा सहवास |
कडवट अमधुर अशक्त जाहला, मधुर सुरेखसा एहसास |
कसे पुरतील दिवस ते अन ते पक्के वेड्यासारखं वागणं |
का नाही ठराव केला, का नाही ठरवल शब्दाला जागण |
- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment