संताप ...संताप ...संताप...
संताप ...संताप ...संताप...
निर्धास्त,बिनधास्त, निर्लज्ज जनता झाली |
बेशिस्त बोजड अन बेलगाम वेळ आली |
घाई ज्याला त्याला, कोण नाही इथे वाली |
शिरजोर जो तो तुडवी नियम पायाखाली |
ना व्यवस्था ना कारभार, फालतुगिरी साली |
रोजचीच कचकच, झालीय रोजचीच बदहाली |
केली रे गटरगंगा,गल्लोगल्ली आली नाली |
दिवस रोजचाच झालाय नपुंसक आणीबाणी |
-सचिन गाडेकर
Comments
Post a Comment