शाळेचा पहिला दिवस ....

शाळेचा पहिला दिवस ....

झाली चहलपहल एकदाची झाला सुरु पुन्हा नवा अध्याय |
नव्या रिती अन नवे पर्व, बघा सगळेच दिसे कसे हाय फाय |

धावू लागले दुडूदुडू अन पळती चिमुकले छोटुलेसे पाय |
रडतय कुणी आकांताने,कुणी मुळूमुळू मनी आठवूनी  माय  |

गप्पा कुणाच्या सुटीच्या रंगती तर कुणा कळेना सांगावे काय |
गुंड कुणी पहिल्याच दिशी अन कोणी तीच पूर्वीची गरीब गाय |

शिक्षक स्वागती रंगले कसे अन बहरला पटांगण मांडून ठाय |
चला कामाला लागा म्हणे थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय  |

                                               ---सचिन गाडेकर

Comments