तिचा फोटो पहिला अन.....
तिचा फोटो पहिला अन.....
तिचा फोटो पहिला अन मन चलबिचल झाले |
जुन्या तिच्या आठवणीत नेत्र कसे पुनश्च नहाले |
झाला घोटाळा अन मन परत मार्गी तिच्या निघाले |
अटकावले जे आजतोवारी क्षणात पुन्हा सैल ते झाले |
होते ठरवले मनाशी अन होते अनेक निर्बंध पातले |
निग्रह गेले सुटली हवा अन झालं काळीज राम हवाले |
नेत्र खुलले,रंगली लाली अन हसरे भाव चेहऱ्यावर आतले |
भिनवू लागली काया जणू रोमरोमात घाव मनातले |
कितीदा पहिला फोटो तिचा चक्क पारायणच घातले |
मन सैरभैर,भावना अनावर, निग्रही अंतर्मन बाटले |
मग इच्छा अनिच्छा संघर्ष पूरा हृदयात दाह अनेक साठले |
तिची भेट पहिली ते आजवर कसे अन किती पल्ले गाठले |
समजावले,दटावले,धमकावले अन शपथेने पंख ही छाटले |
जाणते ती दुखात माझ्या आजही सबंध आभाळ फाटले |
Comments
Post a Comment