मान्सून पर्व .....

मान्सून पर्व .....

अखेर बरसला तू ......

सरी कोसळल्या नभीच्या ओथंबून सारी |
सडा प्राजक्ताचा उमळला वेदनेच्या दारी |

गडगड धडधड बरसला घेण्या दाह माघारी |
भिजवलस ही सुखावलस बरसून दिशा चारी |

सुवास त्या मृत्तिकेचा आभास अमोघ मिलनाचा |
उलगडेल एक पट वर्षाचा ती बहारदार जीवनाचा |

फिरू लागले युगले अन भरला रंग दाट प्रेमाचा |
आणाभाका वाढल्या झाला प्रवास घनदाट दोघांचा  |

वाफाळलेली भजी कुठे सोबतीला अमृततुल्य साथ |
सहली फेरफटके गप्पा टप्पा रंगली हरेक बात |

याद कशी आली तिची, मनी रुतलेली खोल जुनी |
फक्त आठवण आता ओली अन डोळ्यात टच पाणी |

                               -सचिन गाडेकर

Comments