आता अस वाटू लागलय....

आता अस वाटू लागलय   7/6/15

बोलतो किती सार तू का तरी उर भरून येत ?
शब्द स्फुरतात अन घडीघडी का गहिवरून येत ?
न जाणो का सगळ आतल्या आत साठू लागलय...... आता अस वाटू लागलय |

धरलेस धागे सारे तू का काही अलगद निसटून जात ?
उमलतीच पुष्पच जणू का नकळत उन्मळून जात ?
ना जाणो का वाहत्या पाण्यात कोणी चित्र रेखाटू लागलय...... आता अस वाटू लागलय |

सांभाळ होतोयच भला का तरी परकेपणा झालाय ?
आकाश गमावून का पंछी हा  एकदम जायबंदी झालाय ?
आसरा इच्छावा कुठे इथे सार आभाळ फाटू लागलय...... आता अस वाटू लागलय |

हास्य उमलतेच आहे परी का हे नैराश्य पदरी पडते ?
एकटा लढतोय जीवाशी का तलवार अधुरी पडते ?
बरसात रोज नयनी का इथे काळीज दाटू लागलय...... आता अस वाटू लागलय |






Comments