कर फेरविचार

कर फेरविचार  28 जून 2015

गर झाली गोची अती वा झाला कधी प्रश्नांचा भडीमार |
घ्यावा पवित्रा रक्षणी प्रथमी, मग करावा पलटून वार |

भाऊगर्दी बघ्यांची सोबत, जर तोडती लचके टीकाकार |
घे अवसान रणचंडीचे अन चढव तव समशेरीला धार |

होतील आक्रमी गनीम तसे होऊन असत्यावर स्वार |
नकोच डर जर नाही कर , तू बन रक्तिमसे अंगार |

भासेल फितूर आप्त ही अन करती छल कपटाने स्वीकार |
मती थोडी अन थोडे हळवे मन , नको संशयास दरकार |

थकतील बाहू , शमतील चरण परी मन ना माने हार |
ठेव भरवसा , विश्वास मनीचा सताड ते विजयाचे द्वार |
 

थकवेल प्रपंच,वाढते तणाव,भासवेल स्वतच भूमीस भार |
कशी उंच उडोनी ध्यान पिलाशी कशी काय ठेवते घार |

 
रहा शांत प्रसन्न मनमुराद ना करायचे तुजला फार |
सांभाळ सारे नाते गोते सगे सोयरे अन मित्र मंडळी यार |

 
घे संकल्प नवा, कष्ट नवे , देतील बघ हवाहवासा आकार |
देव जसा मग दगडातही भजता अन आहे निर्गुण निराकार |
 

- सचिन

Comments