घडते अवतीभवती..... अलीकडे पलीकडे ...

घडते अवतीभवती..... अलीकडे पलीकडे ...

 

होते स्वारी गनिमांवर मग का कोणाच्या पोटात उठतात सूळ |
व्हावे हे पुन: पुन: या भाषी अन व्हावा आतंकी नाश समूळ |

पठ्ठ्या कोणी मिरवतो येथे झळकतो मिळाले गुण जरी कमाल |
सायकल त्याला कौतुक त्याला होतेय जबर  शुभेच्छाची उलाढाल |

 
नीती चे नावकरी म्हणे बिहारात रक्षु लागले फळबागा |
'मांझे मांझे’ करत कुणाचा स्वाभिमान होतोय जागा |

योगाचे करीत कौतुक कोणी भासू लागले अभिमानी |
कुणी धर्म घेतला तर कुणी म्हणे भगवी ही  मनमानी |

 
जातो कोणी सुट्टीवर प्रदीर्घ तर ही चर्चा इथे रंगते |
आपत्ती प्रलयात ही नराधमी आपसूक लुबाडण्यात दंगते |

 
पाल राज्याचा शिरजोर कुठे, केजरी चे शिपाई डिग्री चोर |
बनावट खेळ चहूकडे, मोर्चा आता महाराष्ट्र सदन कि ओर |

 

-सचिन

Comments